नागरिकांच्या समस्या सोडविण्याबाबत पालकमंत्र्यांच्या सूचना

0
118

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी जिल्ह्यातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. आज (शनिवार) सकाळपासून मंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मागील २० वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना भेटणे आणि त्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रामाणिक काम करणे, हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आणि ऊर्जा देणारे काम आहे, असे यावेळी सतेज पाटील यांनी सांगितले. दरम्यान,  आज सकाळी ८ वाजल्यापासूनच कसबा बावडा येथील निवासस्थानी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक त्यांचे प्रश्न, अडचणी घेऊन आले होते. यावेळी प्रत्येक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांची सोडवणूक करण्याबाबत मंत्री पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.