Published September 19, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘शहरासह जिल्हयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, आरोग्य विभाग व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात पारदर्शकता राहण्यासाठी सर्व सरकारी, महानगरपालिका, खासगी रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत,’ अशी मागणी नगरसेवक संभाजी जाधव यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीत जिल्हयातील प्रशासन व आरोग्य विभागाने केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. गेले सात महिने अहोरात्र सरकारी, महानगरपालिका, खासगी रुग्णालये, कोवोड केअर सेंटर आदी ठिकाणी स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. या सर्व कोविड योध्दयांना मानाचा मुजरा. परंतु काही ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक गैरसमजुतीतून आरोग्य विभाग व डॉक्टरांच्यावर आरोप करतात. काहीवेळा कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर वादाचेही प्रसंग उद्भविलेले आहेत. तसेच खासगी रुग्णालयातील औषधोपचार व बिलाची आकारणी याबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. अशा कटू प्रसंगांना टाळण्यासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या धर्तीवर सर्व कोविड केअर सेंटरमध्ये, सरकारी, महानगरपालिका, खासगी रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही बसविणेत यावेत. त्याचे चित्रीकरण रुग्णांच्या नातेवाइकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जावे. जेणेकरून उपचाराबाबत पारदर्शकता येऊन डॉक्टर, आरोग्य विभाग व रुग्णांचे नातेवाईक यांच्यात समन्वय साधण्यास मदत होईल. कोरोनाच्या या महामारीमध्ये सर्व प्रशासन यंत्रणा, डॉक्टर, सर्व आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत आहेत. या सर्वांचे  आभार मानत, सरकारी, महानगरपालिका व खासगी रुग्णालये, सर्व कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही त्वरित बसविण्यात यावेत.

मृत गीता शिरगावकर ही गोरंबेची असून तिचा विवाह कोगे ता. करवीर येथील युवकाशी अठरा वर्षांपूर्वी झाला होता. तिला मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. गीताचे बऱ्याच वर्षापासून गोरंबेतील सागर शिरगावकर याच्याशी प्रेमसंबंध होते. सहा महिन्यापूर्वी तिने पती व मुलांना सोडून सागरसह विवाह केला होता. चार महिने गीता व सागर गोरंबेत रहायचे. सागरचे पहिले लग्न झाले असून त्यालाही अपत्ये आहेत. विवाहानंतर सागर व गीतांमध्ये कलह व्हायचा. एका रात्रीत गीता बेपत्ता झाल्याची फिर्याद दोन महिन्यापूर्वी स्वतः सागर यांनी कागल पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता.

त्यानुसार पोलिसांनी संशयावरून बसव सर्कल परिसरातील हनुमान मंदिरा मागे राहणाऱ्या २२ आणि ३२ वर्षीय दोन युवकांना ताब्यात घेऊन घेऊन चौकशी केली. या वेळी त्यांनी गीताचा खून करून पुरल्याचे सांगितले. या दोघांनाही पोलिसांनी घटनास्थळी फिरवून अधिक माहिती घेतली. दुपारी एकपासून सायंकाळी उशिरापर्यंत कार्याला निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी थांबून होते. दोन महिन्यापूर्वी खून झाल्याचे वैद्यकीय पथकालाही पाचारण केले होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023