कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना दिली. आज (बुधवार) सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, धोका टळला. सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर लवकरात लवकर फायर ऑडीट करुन घ्यावे. आरोग्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा द्यावी.
तसचे मंत्री यड्रावकर यांनी जिल्ह्यातील बाधितांची संख्या, मुक्त झालेल्यांची संख्या, मृत्यूदर, उपचार घेत असणारे रुग्ण, रेमडेसिवीरची उपलब्धता, इतर अनुषंगिक औषधांची उपलब्धता, आरोग्य साधनांची उपलब्धतेसंबंधी याबाबत सविस्तर माहिती घेतली.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. अनिता सैबन्नावर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राहूल बडे, डॉ. बी. वाय. माळी उपस्थित होते.
कागल (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आज…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील…
मुंबई (प्रतिनिधी) : अर्थमंत्री अजित पवार…
कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वेतवडे…
पन्हाळा (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर…