बकबक करणाऱ्या संजय राऊतांची आधी चौकशी करा : काँग्रेस नेता

0
63

मुंबई (प्रतिनिधी) : सचिन वाझे प्रकरणावरून बकबक करणारे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची आधी चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. याबाबत निरूपम यांनी ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचे म्हटले होते. आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे एनआयएने आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे,  असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले आहेत. हे राष्ट्रीय तपास यंत्रणेने राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावे, असेही निरुपम म्हणाले. 

दरम्यान, जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतले होते, तेव्हाच काही वरिष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.