‘जय भवानी स्पोर्टस्’चा अभिनव उपक्रम…

0
46

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत शिवाजी पेठ येथील जय भवानी स्पोर्ट्सने यंदा साधेपणाने होळी पौर्णिमा साजरी केली. यावेळी पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दान करण्यात आल्या.

हा प्रतिसाद होळी पौर्णिमे पुरता न राहता ज्या-ज्या वेळी आपण स्मशानभूमीत दहन किंवा रक्षाविसर्जन करता जात असाल तर त्यावेळी दानपेटीत गुप्तदान करा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. याची दखल घेत  मंडळाकडून दानपेटीमध्ये गुप्तदानही करण्यात आले.

 तरी या भावनेचा मान राखून मोफत दहन उपक्रमासाठी महानगरपालिकेस सहाय्य करने ही प्रत्येक कोल्हापूरकराची जबाबदारी आहे.