दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा दणदणीत विजय..

0
83

सिडनी (वृत्तसंस्था) : भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना भारताने जिंकला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला १९५ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने १९.४ ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण केले. भारताने ६ विकेटने दुसरा टी-२० सामना जिंकला आहे. टी-२० मालिकेतील भारताचा हा लागोपाठ दुसरा विजय आहे.

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आधी बॅटींग करत १९४ रन केले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने अर्धशतक ठोकले. तिसऱ्या सामन्यात भारताने रवींद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला संघात घेतले होते. तर मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकुर आणि मनीष पांडेच्या जागी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती.