नवी दिल्ली : भारत आणखी एकदा चीनला धक्का देणार आहे.  भारताने ५९ चायनीज ऍप्सवर कायमची बंदी घालण्याची तयारी केलीय. भारत सरकारने सात महिन्यांपूर्वी ५९ चीनी एॅप्सना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आता या ऍप्सना कायमचं बंद करण्यासाठी सरकारनं नवीन नोटीस पाठवली आहे.

या नोटिसीवर कंपन्यांनी दिलेलं उत्तर पुरेसे नसल्यामुळे आता सरकार या ऍप्सवर कायमची बंदी घालण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये भारत सरकारने ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. सरकारने ज्या कंपन्यांवर बंदी घातली त्यामध्ये टिकटॉक, हॅलो अॅप, व्ही चॅट, अलिबाबा, यूसी ब्राऊझर, यूसी न्यूज, शीन, क्लब फॅक्टरी, लाइक, बिगो लाइव्ह, क्लॅश ऑफ किंग्ज आणि कॅम स्कॅनर अशा विविध ऍप्सचा समावेश आहे. भारताने २ सप्टेंबर रोजी ११८ अॅप्सवर बंदी घातली होती. नोव्हेंबरमध्ये आणखी ४३ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यावेळी बंदी घालण्यात आलेल्या ऍप्समध्ये अली एक्सप्रेस सारख्या ऍप्सचा देखील समावेश होता.