मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी आज आठवड्यातील पहिला दिवस ऐतिहासिक ठरला आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आजच्या दिवसाच्या व्यवहारात विक्रमी उच्चांक गाठला.

सेन्सेक्स आज पहिल्यांदाच ६२७०० आणि निफ्टी १८६१४ वर पोहोचला. शेअर बाजाराने आज जबरदस्त तेजी दाखवली. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२,५०४ अंकांवर २११ अंकांच्या उसळीसह प्रथमच ६२,५०० च्या वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८,६१४ या विक्रमी उच्चांकी पातळीवर जाऊन ५० अंकांच्या वाढीसह १८,५६२.७ वर बंद झाला.