पंपोर भागात भारतीय लष्कराची चकमक : दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
5

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या अवंतीपोराच्या पंपोर  भागात आज (शुक्रवार) भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीनंतर  लष्कराने दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला.

यामध्ये ठार झालेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीनच्या हिट स्क्वॉयडचा एक भाग होते. त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांची हत्याही केली होती. यांच्याकडून एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी, ठार झालेल्या एक दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक आहे. हा खिरयूचा रहिवासी असून त्याने एका सरकारी शाळेतील शिपायाची हत्या केली असल्याचे सांगितले.