भारत व्यापार बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पाठिंबा…

0
585

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) च्या वतीने जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेल्या भारत व्यापार बंदला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि सर्व संलग्न संघटनेचा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला. भारत व्यापार बंद आणि देशव्यापी चक्काजामबाबत चर्चा करण्यासाठी आज (शनिवार) कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजमध्ये बैठक पार पडली.

नागपूरात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय व्यापार संम्मेलनात जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंद  आणि देशव्यापी चक्काजामची घोषणा करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर भारत बंदला पाठींबा देण्यासाठी कोल्हापुरात बैठक पार पडली.

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे,  कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, चार्टर्ड अकौंटंट दीपेश गुंदेशा, चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदिपभाई कापडीया, संचालक अजित कोठारी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, राजू पाटील,  वैभव सावर्डेकर, संचालक भरत ओसवाल, विज्ञानंद मुंढे, प्रशांत शिंदे, राहूल नष्टे, सभासद, व्यापारी उपस्थित होते.