कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या ट्वेन्टी-ट्वेन्टी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत. यामध्ये आज (रविवार) भारत-पाकिस्तान अशी मॅच रंगणार आहे. परंतु, कोल्हापूरात प्रशासनाने मात्र क्रिकेटप्रेमींवर वचक लावला आहे. त्यामुळे प्रशासनावर नाराजीचा सुर उमटत आहे.

भारत-पाकिस्तान मॅच बघण्यासाठी कोणतीही स्क्रीन अथवा विजयी उत्सव साजरा करण्यावर पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. यामुळे तमाम क्रिकेट रसिकांवर नाराजीचा सुर उमटत आहे. आपण भारतातच आहोत का ? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात आहे. तर मँच दुबईत बंदोबस्त कोल्हापुरात, असा मिश्कील मॅसेजही व्हायरल होत आहे.

तरी हा बंदी आदेश प्रशासनाने मागे घ्यावा अशी मागणी होत आहे. तर भारताने मॅच जिंकल्यानंतर त्याचा विजयोत्सव साजरा न करू देणे  म्हणजे आपण पाकिस्तान किंवा तालिबानमध्ये राहतो का ? असा सवालही आता सोशल मिडियातून व्यक्त होत आहे.