भारत – न्यूझीलंड कसोटी अनिर्णित

0
29

कानपूर (वृत्तसंस्था) : यजमान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. भारताला विजयासाठी अखेरच्या काही षटकांमध्ये अवघ्या १ विकेटची गरज होती. मात्र, डेब्युटंट रचीन रवींद्र आणि अझाज पटेल या दोघांनी धावपट्टीवर तळ ठोकून चिवट खेळी केल्यामुळे भारताला विजय मिळवता आला नाही.   

भारताने न्यूझींलडला विजयासाठी २८४ धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने चौथ्या दिवसखेर ४ धावा करुन १ बळी घेतला. पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी आणखी २८० धावांची गरज होती. तर भारताला ९ गडी बाद करावयाचे होते. मात्र, शेवटचा एक बळी घेण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही.   रचीन रवींद्र आणि अझाज पटेल या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवला. रचीनने ९१ चेंडूत नाबाद १८ धावांची खेळी केली. तर अझाजने २३ बॉलमध्ये २ धावा करत संघाला पराभवापासून वाचवले. न्यूझीलंडकडून  टॉम लॅथमने सर्वाधिक ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक ४ बळी टिपले. तर रवीचंद्रन अश्विनने ३ फलंदाजांना तंबूत धाडले.