पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून भारताचा दारूण पराभव

0
57

चेन्नई (वृत्तसंस्था): भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा २२७ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे. याचसोबत इंग्लंडने चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने ठेवलेल्या ४२० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १९२ रन्सवर ऑल आऊट झाला.

कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली, तर शुभमन गिल 50 रन करून बाद झाला.अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम हे तिघे शून्यावर आऊट झाले. इंग्लंडकडून जॅक लीचने ४, जेम्स अंडरसनने ३ तर जोफ्रा आर्चर, डॉमनिक बेस आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने भारत-इंग्लंड यांच्यातली ही चार टेस्ट मॅचची सीरिज महत्त्वाची आहे.न्यूझीलंडच्या टीमने आधीच फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा आहे.