चेन्नई (वृत्तसंस्था): भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे खेळला जात आहे.आज (सोमवार) सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ १७८ रनवर ऑलआऊट झाला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी ४२० रन्सची आवश्यकता आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या बॅट्समनना भारतीय बॉलर्सनी झटपट तंबूत धाडले.त्यामुळे इंग्लंड मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

भारताचा स्पिनर बॉलर आर.अश्विनने इंग्लंडच्या तीन खेळाडूंना माघारी धाडले.पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी करणारा कॅप्टन जो रुट अवघ्या 40 रन्समध्ये पॅव्हेलियनमध्ये परतला. रोरी बर्न्सला आर. अश्विनने दुसऱ्या डावातील पहिल्याच बॉलवर आऊट करत इतिहास रचला. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे इग्लंडचा संघ १७८ रनवर ऑलआऊट झाला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी ४२० रनची आवश्यकता आहे.