यड्रावमध्ये अपक्ष उमेदवारांनी फोडला प्रचाराचा नारळ..! (व्हिडिओ)

0
486

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव (ता.शिरोळ)  ग्रामपंचायत  निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांनी आज (मंगळवार) ग्रामदैवताला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. प्रभाग क्रमांक ४  मधील उमेदवार  नितीन बिरंजे,  प्रभाग क्रमांक ३ चे औरंग शेख यांनी ग्रामदैवत व सर्व मंदीरमध्ये श्रीफळ वाढवून आशीर्वाद घेतला.   

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आरोग्य  राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या यड्राव गावामध्ये एकूणच भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. शेतकरी संघटनेने बिनशर्त पाठिंबा दिला आहे.  शिवसेनेला दोन ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे.  त्यातच  अपक्षांनीही शड्डू ठोकल्याने निवडणूक रंगदार होण्याची शक्यता आहे. आता  प्रचारमध्ये  कोण आघाडी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.