यड्रावमध्ये सत्तांतर : महाविकास आघाडीची बाजी (व्हिडिओ)

0
764

इचलकरंजी (प्रतिनिधी) : राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व  सतेंद्रराजे नाईक निंबाळकर यांच्या महाविकास आघाडीने यड्राव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता खेचून आणत सत्तांतर घडवले. तर विठ्ठलराव नाईक निंबाळकर व राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या श्री गुरुदेव दत्त महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला.

 

 

यड्राव ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज (सोमवार) निकाल जाहीर झाला. यात महाविकास आघाडी ९, विठ्ठलराव नाईक निंबाळकर व राजवर्धन नाईक निंबाळकर यांची श्री गुरुदेव दत्त महाविकास आघाडी ७ तर अपक्ष १ जागांवर विजयी झाली. महाविकास आघाडीने सत्ता खेचून आणत सत्तांतर केल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.  गावामध्ये मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.