आजरा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर

0
752

आजरा (प्रतिनिधी) :  आजरा तालुक्यातील ५  ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर २१ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यात हाळोली, हातीवडे, सिंरसगी, सुळे, कासार कांडगाव, महागोंड, निगुडगे, किणे, सरोळी या गावात  प्रस्थापितांना धक्का देत सत्तांतर झाले आहे.  येथे युवा चेहर्‍यांना ग्रामस्थांनी संधी दिली. तर जाधेवाडी, चिमणे, मुरुडे, मुमेवाडी, चव्हाणवाडी,  हालेवाडी, देवकांडगाव, बेलेवाडी,  मलिग्रे, कोवाडे येथे सत्तारूढांना मतदारांनी पुन्हा पसंती दिली.

देवर्डे ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र, वाटंगी सत्ताधारी विजयी, कोवाडेत उपसभापती वर्षा बागडी यांचे पती व माजी सरपंच विकास बागडी यांचा तर निंगुडगे येथे सरपंच संघटनेचे तालुका प्रमुख संभाजी सरदेसाई यांचा धक्कादायक पराभव  झाला. महागोंड मध्ये सरपंच सुलाताई गुरव यांचा पराभव, तर सरोळीत तालुका संघाचे चेअरमन एम.के.देसाई व किणेत माजी सभापती मसणू सुतार यांच्या आघाडीला पराभव स्वीकारावा लागला.