यड्राव येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात

0
82

शिरोळ (प्रतिनिधी)  :  यड्राव येथील विविध ठिकाणी ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट येथे संचालक महावीर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) ,  सीईओ अभिजित पाटील,  व्हा चेअरमन महावीर खवाटे,  संचालक आदी उपस्थित होते.

कुमार व कन्या मंदिर येथे भगवान दानोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच पुरंदर मगदूम, शिवाजी दळवी, महेश निर्मळ, मुख्याध्यापक एम. के. कांबळे,  प्रभारी मुख्याध्यापिका उषा पाटील  उपस्थित होते.

शरद विकास सोसायटी  येथे बापू उपाध्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महावीर पाटील, आपासो लवाटे, मलगोडा पाटील, संचालक सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण तर ध्वजाचे पूजन विजयानंद माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं. स. चे माजी सभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर,  सरपंच सरदार सुतार,  प्रदीप कोळी,  राजू पाटील, अर्जुन आदमाने,  केशव धुमाळे,  उपसरपंच प्राची हिंगे, मारुती क्षीरसागर, राजू जांभळे,  ग्रामविकास अधिकार व्ही. व्ही. गावडे उपस्थित होते.

सदाबहार पतसंस्था येथे राजेंद्र घाटवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चेअरमन अशोक रेंदाळे,  व्हा चेअरमन आपासो पाटील, शौकत मोमीन, कल्लू चव्हाण,  भूपाल दावाडे,  नरसू घाट,  उपस्थित होते.

नाईक निंबाळकर विकास सेवा सोसायटी येथे चेअरमन विलास माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी व्हा चेअरमन चवगोडा पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर , जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, सदस्य दत्ता कोळी,  औरंग मुजावर,  अशोक साळोखे,  उपस्थित होते.

तलाठी कार्यालय येथे तलाठी नितीन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रमेश माने ग्रा. प. सदस्या मंगल कांबळे,  पोलीस पाटील, जगदीश संकपाळ, रवी भोसले,  पांडुरंग कांबळे,  दादासो चौगुले, विजय कोळी उपस्थित होते.