कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : स्‍वातंञ्य दिनानिमित्त  कोल्‍हापूर जिल्‍हा दूध संघाच्‍या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पस्थळी चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्यात आले.

यावेळी विश्‍वास पाटील म्हणाले की,  गोकुळच्‍या उभारणीत दूध उत्‍पादकांबरोबर  संघाच्या कर्मचाऱ्यांचे योगदान आहे.  दूध संघाच्‍या प्र‍गतीमुळे दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. तसेच दूध उत्‍पादक शेतक-यांची आर्थिक उन्‍नती झाली आहे.

ताराबाई पार्क येथील  कार्यालयात संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, गोगवे चि‍लींग सेंटर येथे संचालक कर्णसिंह गायकवाड,  गडहिंग्‍लज चिलींग सेंटर  येथे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,  बिद्री चिलींग सेंटर  येथे संचालक रणजितसिंह  पाटील,  शिरोळ चिलींग सेंटर  येथे संचालक डॉ. सुजित मिणचेकर,  तावरेवाडी चिलींग सेंटर येथे संचालक बयाजी शेळके,  महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर  व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना येथे सहा. व्यवस्थापक प्रसाद मुजुमदार यांच्‍या हस्‍ते  ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी दूध संघाचे कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर,  बोर्ड सेक्रेटरी एस.एम. पाटील,  डेअरी मॅनेजर अनिल चौधरी,  संघाचे अधिकारी डी. के. पाटील,  कापडीया, स्‍वामी आदीसह कर्मचारी उपस्थित होते.