हुपरीत नव्याने झालेले अतिक्रमण न काढल्यास बेमुदत उपोषण : नितीन काकडे  

0
263

रांगोळी (प्रतिनिधी) :  हुपरी नगरपरिषदेने हातावर पोट असणाऱ्या तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्या सामान्य नागरिकांचे अतिक्रमण काढले आहे. तर दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या काहींनी अतिक्रमण करून गाळे भाड्याने दिले आहेत, तर काहींनी गाळे विकले आहेत. यामध्ये काही विद्यमान नगरसेवकांनी सुद्धा अतिक्रमण केले आहे.

त्यामुळे हुपरी नगरपरिषदेने त्यांची अतिक्रमण काढावीत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल. असा इशारा लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन काकडे आणि संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे हुपरी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

त्यामुळे आता नगरपालिका काय कारवाई करते. किंवा परत एकदा या धनदांडग्या अतिक्रमणधारक यांच्याबाबतीत मूग गिळून गप्प बसते हे पाहावे लागणार आहे.