राज्यातील कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन वाढविला

0
132

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेला लॉकडाऊन यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय आज (शुक्रवार) घेण्यात आला.  ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून राज्य सरकारने पुन्हा एकदा २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.

याबाबतचे आदेश आज काढण्यात आले असून आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच २८ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. दरम्यान, ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.