कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील चोवीस एकूण १,२४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (मंगळवार) १,५३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २७३, आजरा- ५०, भुदरगड- २१, चंदगड- २१, गडहिंग्लज- ३९, गगनबावडा- २, हातकणंगले-१६६, कागल- ६२,  करवीर- १८४, पन्हाळा- १००, राधानगरी- ३२, शाहूवाडी-१७, शिरोळ- १२८, नगरपरिषद क्षेत्र- ११३, इतर जिल्हा व राज्यातील- ४१ अशा १२४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ४३, ६४९

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या –  १, ३०, २५१

मृतांची संख्या – ४,४८५

उपचार सुरू असलेले रुग्ण – ८, ९१३