जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ : चोवीस तासात २३७५ जण पॉझिटिव्ह  

0
656

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासांत २३७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १५५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात २२६ तर करवीर तालुक्यात ५१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर २०, ७४१ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र २२६, आजरा- १०८, भुदरगड- ९०, चंदगड- २०, गडहिंग्लज- ११२, गगनबावडा – ३, हातकणंगले – ३२८, कागल- १६७करवीर- ५१४, पन्हाळा- १३८, राधानगरी- १३६, शाहूवाडी – ७४, शिरोळ २२६, नगरपरिषद क्षेत्र २०६, इतर जिल्हा व राज्यातील- २७ अशा २३७५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ८६, ९१२ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ६८, १६८

मृतांची संख्या , २२१

उपचार सुरू असलेले रुग्ण १३,५२३