मुंबईतील ‘झी समुहा’च्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

0
118

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील लोअर परळ येथील झी समुहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने आज (सोमवार) छापा टाकला आहे. यावेळी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चौकशीसह फायलींची छाननी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, दिवसभर सुरु असलेल्या कारवाईसंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या कारवाईत आयकर विभागाच्या ६ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. तर याचवेळी आयकर अधिकाऱ्यांची वरळी परिसरातील कार्यालयावर छापा टाकला आहे.  आयकर कर चुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली झी समूहाच्या १५ ठिकाणी  सर्च ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.