राशिवडे येथे आठवडी बाजारात पाकीटमारीच्या घटना…

0
436

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे बुद्रुक येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. पंचक्रोशीतील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे याठिकाणी धामोड, शिरगाव, परिते,  हसूर आणि परिसरातील गावांमधील व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी च्या घटनांमध्येही वाढ होताना दिसते आहे.

आज (शुक्रवार) दिवसभरात पाकीटमारीच्या तीन ते चार घटना घडल्याचे उघडकीस आले. या अगोदरही या बाजारात मोबाईल चोरीच्याही घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे बंद असणारा बाजार नुकताच सुरु झाला आहे. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी दिसते. पण याचा फायदा चोरटे घेत आहेत. अशा भुरट्या चोरांना आळा घालण्यासाठी बाजारादिवशी पोलीस बंदोबस्तासाठी असावेत अशी मागणी ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.