आळते येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन

0
275

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कसबा आळते येथे जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या जिल्हा परिषद फंडातून आणि १५ व्या वित्त आयोगातून १ कोटी ५३ लाखांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचे उद्‌घाटन किरण इंगवले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, ग्रा.पं. सदस्य शितल हावळे, अजिंक्य इंगवले, माजी सरपंच संजय दिक्षीत, असगर मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. अरूण इंगवले म्हणाले की, गावात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढेही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावली जातील. 

यावेळी आळतेच्या सरपंच सविता कांबळे, उपसरपंच देवराज कांबळे, ग्रामविकास अधिकारी व्ही.टी. फोलाणे यांच्यासह ग्रा.पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.