बेकनाळमध्ये दोन दूध संस्थांचे उद्घाटन

0
12

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील बेकनाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी व रेणुका माता या दोन दूध संस्थेचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी मुश्रीफ यांच्या हस्ते श्री विठ्ठल मंदिर येथील आरसीसी गटर बांधकाम, काझी बोळ येथील आरसीसी काँक्रिट या कामांचाही प्रारंभ झाला.

यावेळी सरपंच रोहिणी पाटील, उपसरपंच अशोक जगताप, राम पाटील, आनंदा पाटील, टी. एस. धुमाळ, शामराव जगताप, मधुकर जगताप, मधुकर गुरव, गोपाळ जाधव, प्रकाश सुतार, आनंदा धबाले, अनिल धुमाळ, गीता रामचंद्र पाटील, आशाताई धुमाळ आदी प्रमुख उपस्थित होते.