गडहिंग्लज येथे ‘स्वाभिमानी’च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

0
43

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडी रिंगणात आहे. गडहिंग्लज येथे स्वाभिमानी आघाडीच्या विभागीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नेसरी शिक्षण समिती संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक रफिक पटेल यांनी केले. गडहिंग्लज, आजरा, चंदगड विभागाचे उमेदवार सचिन शिंदे यांनी मनोगतात स्वाभिमानी सहकार आघाडी विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जे. बी. बारदेस्कर, व्ही. बी. नाईकवाडी, प्रकाश पताडे, स्वाती कोरी, एन. एस. घोलप, अरविंद बारदेस्कर, गंगाराम शिंदे, डी. व्ही. चव्हाण, जे. डी. वडर, एस. एन. इनामदार, माजी चेअरमन सदाशिव देसाई, एस. पी. थरकार, संजय भांदुगरे, एकनाथ देसाई, संजय घोडके, सचिन रेडेकर, ए. ए. कापसे, विनायक नाईक, राजाराम माने, संपत सावंत, बजरंग गरुड, पी. के. हरेर, डी. जी. सावंत, ए. पी. सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संजय देसाई यांनी आभार मानले.