कासारवाडा येथे शिवनेरी बांधकाम कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

0
95

राधानगरी प्रतिनिधी : सरवडे येथील शिवनेरी बांधकाम कामगार संघटनेची शाखा  कासारवाडा -पाटणकर (ता. राधानगरी) येथे काढण्यात आली आहे. या शाखेचे उद्घाटन अध्यक्ष प्रकाश पोवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जनरल सेक्रेटरी जोतिराम सुतार, उपाध्यक्ष दत्तात्रय माने, जिल्हा कमिटी सदस्य भिकाजी पाटील, लहू पाटील, तालुका सदस्य शिवाजी रानमाळे, कृष्णात बुजरे, शाखा अध्यक्ष संभाजी गाडीवड्ड,  उपाध्यक्ष शिवाजी गाडीवड्ड, सेक्रेटरी शिवाजी कांबळे, सह सेक्रेटरी अमोल पाडळकर आदीसह संघटना पदाधिकारी, बांधकाम कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते. खजानिस शंकर मोरे यांनी स्वागत केले. तर ग्रामसेवक संभाजी वरुटे यांनी आभार मानले.