कळे (प्रतिनिधी) : शिवगर्जना फाऊंडेशन शैक्षणिक व सामाजिक संस्था सातार्डे (ता. पन्हाळा) संचलित शिवगर्जना स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाचे (वाचनकट्टा) उद्घाटन प्रमुख पाहुणे स्वरुप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी एन. टी. पाटील हे होते.

शिवगर्जना फाऊंडेशनच्या स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा लाभ ग्रामीण भागातील मुलांनी घ्यावा, असे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. उदयसिंह चोपडे यांनी केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत, तसेच वाचन संस्कृती वाढविण्यासाठी २०१७ पासून विनामूल्य ग्रंथालय शिवगर्जना फाऊंडेशनतर्फे सुरू केले आहे. यामध्ये ७० स्पर्धा परीक्षा पुस्तके व ३०० कांदबरी वाचनासाठी उपलब्ध आहेत. शिवगर्जना संस्थेचे संस्थापक दिगंबर चव्हाण, अक्षय मोहिते, संग्राम पाटील, निंबा भांगरे, सदाशिव हांडे, शंकर चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन अमर परीट यांनी केले. अमोल जोगदंड यांनी आभार मानले.