पाडळी बुद्रुक येथे संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उद्घाटन

0
185

कोल्हापूर   (प्रतिनिधी)  :  पाडळी बुद्रुक (ता. करवीर ) येथे करवीर तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे  उद्घाटन आज (सोमवार) करण्यात आले.   

सातत्याने सुरू असलेल्या विविध आंदोलनामुळे संभाजी ब्रिगेड समाजाची गरज बनत आहे. समाजाच्या कोणत्याही प्रश्नामध्ये आम्ही यापुढे अधिक जोमाने, अधिक विश्वासाने काम करण्यास बांधील असल्याच्या भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.