इचलकरंजी येथील खा.धैर्यशील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

0
80

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार धैर्यशील माने यांच्या इचलकरंजी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

विकास कामाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासंदर्भात प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही खा. धैर्यशील माने यांनी दिली. जनसंपर्क कार्यालयात येऊन जनतेने  आपल्या सर्व समस्या मांडाव्यात त्या सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी पाणीपुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे, बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, नगरसेवक रविंद्र माने, भाऊसो आवळे, रविंद्र लोहार, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या, दिलीप  मुथा, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी पाटील, सुभाष मालपाणी, सचिन भुते आदीसह कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.