सावर्डे दुमालात पेव्हिंग ब्लॉक कामांचे उद्घाटन…

0
36

म्हालसवडे (प्रतिनिधी) : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचे उद्घाटन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

माजी सरपंच कुंडलिक कारंडे म्हणाले, गावात आतापर्यंत लाखो रुपयांची  विकास कामे केली आहेत. २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राममधून दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या रकमेतून पेव्हिंग ब्लाकसाठी सात लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर उर्वरित तीन लाख रुपये रस्त्यांसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी सरपंच सुवर्णा कारंडे, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, संतोषकुमार पाटील, पंढरीनाथ मोहिते, संभाजी निकम, दत्तात्रय निकम, प्रकाश कारंडे, के. बी. भोसले, बाजीराव सुर्वे, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here