राशिवडे (प्रतिनिधी)  : शेतीला आधुनिक शास्त्राची जोड देऊन योग्य मार्गदर्शन घेऊन  शेती उत्पन्न कसे वाढवावे, याविषयी कृषी विज्ञान मंडळामार्फत शेतकऱ्यांना प्रबोधित केले जाते. याची व्याप्ती वाढावी म्हणून या मंडळामार्फत गावोगावी कृषी मित्रांची नेमणूक केली आहे. राशिवडे बुद्रुक येथे सुरेश गोंगाने आणि रूपेश सरनाईक या दोघांची कृषीमित्र म्हणून निवड केली आहे.

राशिवडे परिसरातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन माती परीक्षण आणि इतर मार्गदर्शन करण्यासाठी हे दोघे कार्यरत असणार आहेत. माती परीक्षण आणि मार्गदर्शनासाठी माफक शुल्क आकारले जाणार आहे. याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी या ठिकाणी मार्गदर्शक फलकाचे अनावरण  करण्यात आले.

यावेळी सरपंच कृष्णात पोवार, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. आपल्या मंडळामार्फत सुरू असणाऱ्या विविध सेवांचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मंडळ प्रमुख युवराज कारंडे यांनी केले.