‘इनरव्हील क्लब’च्या सुका कचरा संकलन केंद्राचे उद्‌घाटन

0
134

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकटी संस्थेच्या वतीने सुरू केलेल्या सुका कचरा उठाव उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी सुका कचरा संकलन केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे साईक्स एक्सटेन्शन येथील क्लबच्या कार्यालयात अध्यक्षा रुपाली बाड यांच्या हस्ते आज (सोमवार) उद्‌घाटन करण्यात आले.

एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, आपल्या घरातील, कार्यालयातील प्लॅस्टिक कचरा संस्थेच्या परिसर विकास भगिनीकडे देण्याचा निर्णय यावेळी क्लबच्या सर्व सदस्यांनी घेतला. निसर्गाच्या संवर्धनासाठी कचरा संकलन उपक्रम संस्थेने राबविला आहे. त्यास  पाठबळ देणे आवश्यक आहे, असे मत क्लबच्या अध्यक्षा रुपाली बाड यांनी व्यक्त केले.

यावेळी क्लबच्या आरती रास्ते, माणिक पाटील, दीपा जाधव, डॉ. कविता पाटील, जयश्री देशींगे, पद्मजा शिंदे, शर्मिष्ठा चौगुले, अश्विनी जोशी यांच्यासह एकटी व अवनी संस्थेच्या कार्यकर्त्या सविता कांबळे, वनिता कांबळे, अन्नपूर्णा कोगले, किरण देसाई, रविराज कांबळे व संस्थेच्या परिसर विकास भगिनी उपस्थित होत्या.