यड्राव येथे विकासकामांचे उद्घाटन    

0
80

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्रावमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये नांदणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या स्वनिधीतून बोअर मारण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये बोअर मारून देण्याचे आश्वासन राजवर्धन निंबाळकर यांनी दिले होते.  त्या आश्वासनाची पूर्तता तत्काळ केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.  

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर,  नूतन ग्रामपंचायत सदस्या वैशाली काळगे, नसीमा मिरजकर, सदस्य प्रदीप पाटील, राजू झुटाळ,  समीर मिरजकर,  मनोज पोवार,  पिंटू घोरपडे, मुबारक मिरजकर आदीसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.