करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर-वळीवडे येथील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, गटर्सचे काम अशा एकूण ६५ लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य वंदना पाटील, करवीर पं.स. चे माजी सभापती प्रदीप झांबरे, पं. स. सदस्य शोभा राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

बऱ्याच दिवसांपासून गांधीनगर ते वळीवडे हा रस्त्याचे काम रखडले होता. आज (रविवार) या रस्त्याच्या कामांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले. ६५ लाखांच्या निधीतून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करुन हा रस्ता तयार केला आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विजय चौगले, उपसरपंच सुषमा शिंगे, माजी उपसरपंच प्रकाश शिंदे, सचिन चौगुले, भगवान पळसे, अरुण पोवार, राजाराम कुसाळे, हेमलता माने, सैनाज नदाफ, सुरेखा चव्हाण, उज्ज्वला पोवार,  वैशाली घाटगे, अनिता खांडेकर, संगीता चव्हाण, विलास मोहिते,  दिपक पासान्ना आदी उपस्थित होते.