शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील कनवाड येथे भारतीय जनता युवा मोर्चा शाखेचे उदघाटन व फलकाचे अनावरण भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी भाजपा नेते शिवाजी खोंद्रे, प्रमोद थोरात, घालवाडचे उपसरपंच विनोद गायकवाड, हसूर ग्रा.पं सदस्य व युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील, शिरटी ग्रा.पं. सदस्य अभय गुरव, कुटवाडचे युवा नेते नवजीत पाटील , युवा मोर्चा सरचिटणीस संजीव नरगच्चे, कनवाड ग्राम अध्यक्ष इम्तियाज पटेल, उपाध्यक्ष राहुल गौराज, इस्माईल दरगावाले, शशिकांत कांबळे, विशाल कुपाडे, रमजान सनदी आदींसह युवा मोर्चाचे नूतन पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.