रेंदाळ येथे कन्या शाळेत सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन   

0
79

रांगोळी (प्रतिनिधी) : रेंदाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कित्येक दिवस प्रलंबित असलेल्या कन्या शाळा आवार सुशोभीकरणाचे काम  सुरू करण्यात आले आहे. कन्या शाळेच्या आवारात काँक्रिटीकरण, संरक्षक भिंत, मुलींचे स्वच्छतागृह, दिवाबत्ती आदी कामांचा शुभारंभ सभापती दीपक पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

शाळेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी सरपंच विजय माळी, शिक्षण सभापती मनीषा पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, मुख्याध्यापक, शिक्षक,  शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.