कोल्हापूर (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे वर्षा व्याख्यानमालेचे माजी मंत्री, आमदार विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४४ वर्षांपासून सुरू असलेली वर्षा व्याख्यानमाला आजपासून सुरू झाली. ७ ऑगस्टपर्यंत ही व्याख्यानमाला सुरु राहणार आहे.

१ ऑगस्टला कुरळपचे सचिन भगवान पाटील यांचे अपरिचित पन्हाळ्याचे पैलू या विषयावरील व्याख्यानाने प्रारंभ झाला. ३ ऑगस्टला इस्लामपूरचे राजा माळगी यांचे आता जागे होऊ या, ४ ऑगस्टला खानापूरचे दत्तात्रय महाराज जगताप यांचे प्रवचन, ५ ऑगस्टला पारगाव येथील गणेश लोळगे यांचे ‘ढाल तलवारीच्या पलीकडील छत्रपती शिवाजी महाराज’, ६ ऑगस्टला कोल्हापूर येथील सागर पांडुरंग वातकर यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, ७ ऑगस्टला बहिरेवाडी येथील संपतराव शामराव चव्हाण यांचे ‘चला हसत जगू या; हे ग्रामीण कथाकथन होणार आहे.

यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, वारणा बझारचे जॅनरल मॅनेजर शरद महाजन, आप्पासाहेब खोत, व्ही. एस. कोले, बाबासाहेब कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.