नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (सोमवार) २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. यंदाच्या अर्थसंकल्पामुळे काही वस्तू महाग तर काही स्वस्त झाल्या आहेत.

खालील वस्तू झाल्या महाग…

मोबाईल हँडसेट आणि त्याचे भाग, चार्जर्स.

गाड्यांचे स्पेअर पार्ट्स

इलेक्ट्रॉनिक उपकरणे – फ्रीज, टीव्ही वगैरे

इम्पोर्टेड कपडे

सोलर इन्व्हर्टर, सौर उपकरणे

कापूस

एलईडी बल्ब

या वस्तू झाल्या स्वस्त

पोलादाने बनविलेल्या वस्तू

सोने

चांदी

तांबे धातूने बनविलेले साहित्य

लेदरच्या वस्तू