उचगावमध्ये चार मोटारसायकल चोरट्यांना अटक : पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

0
1464

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव गावच्या हद्दीत १३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी सापळा रचून चार मोटारसायकल चोरट्यांना अटक केलीय. सचिन आगलावे, राहुल चौधरी (दोघे रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर कोल्हापूर), हृषीकेश कुडे, दीपक सूर्यवंशी (दोघे रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत.  

पोलिसांनी १२ मोटारसायकलींसह १ कार असा ३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सचिन आगलावे हा सराईत गुन्हेगार असून एक घरफोडीचाही गुन्हा उघडकीस करण्यात आलाय, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.

सावंत यांचेसह सपोनि सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार सुनील कवळेकर, अमोल कोळेकर, अजित वाडेकर,पांडुरंग पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही कारवाई केली.