राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरचा झेंडा…

७४ पदकांची लयलूट करत पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

0
189

कोल्हापूर : (प्रतिनिधी) : कोलवा, गोवा येथे पार पडलेल्या तिसऱ्या नॅशनल यूथ स्पोर्टस गेम २०२१ स्पर्धैत जलतरण प्रकारात कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग व नॉर्मल जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन केले. या खेळाडूंनी तब्बल ७४ पदके प्राप्त करीत ग्रुप चॅम्पियनशिप व सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यामध्ये ६४-सुवर्ण व १० रौप्य अशा एकूण ७४ पदकांचा समावेश आहे. १७ ते १९ जुलै या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पदकविजेत्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे (दिव्यांग जलतरणपटू) :

रिया सचिन पाटील – ५ पदके, भूषण योगेश डोंगरसाने – ३ पदके, ऋग्वेद रमेश जाधव – ५ पदके, नौमान हमीद तांबोळी – २ पदके, ऋतुजा उत्तम जाधव – २ पदके, उत्कर्ष उत्तम चव्हाण – ५ पदके, सुमित राजेंद्र कुरणे – ५ पदके, अथर्व शहाजी पाटील – ५ पदके, जोया अबिद तांबोळी – २ पदके,

नॉर्मल जलतरणपटू :

सोहम भरत पाटील – ५ पदके, अनुराधा संजय पाटील – ५ पदके, सोहम सुनील मोहिते – ५ पदके, ४)निल दतात्रय आवटे – ५ पदके, शादाब अखलाख देसाई – ५ पदके.

या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर वाढला आहे. या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक संजय पाटील व अनुराधा पाटील यांचे मार्गदर्शन, पालक तसेच छत्रपती राजाराम तलाव मंडळाच्या सभासदांचे प्रोत्साहन लाभले.