येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त : नितीन गडकरी

0
171

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. येत्या काळात राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना वारंवार थांबण्याची गरज नाही. कारण येत्या दोन वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले की, नवी जीपीएस आधारित कलेक्शन यंत्रणा आणण्यात येणार आहे. ही यंत्रणा सरकारच्या अंतिम टप्प्यात आहे. ही लागू झाल्यास वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. यामुळे वाहनांची संख्या, ये-जा असा प्रवास देखील कळू शकणार आहे. तसेच टोलची रक्कमही वाहनचालकांच्या अकाऊंटमधून पैसे कट करुन घेतली जाईल.

रशियन सरकारच्या मदतीने भारत सरकारने जीपीएस आधारित प्रणाली आणली आहे. जी दोन वर्षात भारत टोलनाकामुक्त करेल. यामुळे टोलनाक्यावर होणारी गर्दी कमी होईल. तसेच टोल नाक्यांच्या देखभालीवर होणार सरकारचा खर्च कमी होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.