कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८१३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ जणांचे मृत्यू झाले असून ३४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये २०,६५७ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र१०२, आजरा – १२, भुदरगड – १, चंदगड- २२, गडहिंग्लज- ४५, गगनबावडा – ०, हातकणंगले – ८३, कागल – २६करवीर- १६३, पन्हाळा – ११३, राधानगरी – ३९, शाहूवाडी – ७५, शिरोळ – ६१, नगरपरिषद क्षेत्र६७, इतर जिल्हा व राज्यातील – ४ अशा ८१३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९६, ७२० 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ८५, ४६६

मृतांची संख्या – ५, ५२५

उपचार सुरू असलेले रुग्ण,७२९