जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७११ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २६ जणांचे मृत्यू झाले असून ८२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र १६८, आजरा – १९, भुदरगड – ०, चंदगड- २, गडहिंग्लज- ३१, गगनबावडा – ०, हातकणंगले – १०४, कागल – २७करवीर- १३०, पन्हाळा – ६०, राधानगरी – ५, शाहूवाडी – २५, शिरोळ – ६१, नगरपरिषद क्षेत्र ६७, इतर जिल्हा व राज्यातील – १२ अशा ७११ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण, ९३, २९९ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या, ८०, ६५२

मृतांची संख्या – ५, ४२९

उपचार सुरू असलेले रुग्ण, २१८