कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शुक्रवार) दिवसभरात १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ९४९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ४, राधानगरी तालुक्यातील १ आणि शाहूवाडी तालुक्यातील १ अशा सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,६१४.
डिस्चार्ज – ४७,८६८.
उपचारासाठी दाखल रुग्ण – ३६.
मृत्यू – १७१०.