कोल्हापूर कोरोना अपडेट : मागील चोवीस तासात २३४ जणांना लागण

0
166

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागलीय. रुग्णसंख्येत घट होत असून मृत्यूदरातही चांगलीच घसरण होत आहे. मागील चोवीस तासात २३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून ४८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ६०, आजरा – ३, भुदरगड – ०, चंदगड – १, गडहिंग्लज , गगनबावडा – ०, हातकणंगले – १९, कागल – ८करवीर – ४५, पन्हाळा – १८, राधानगरी – १, शाहूवाडी १३, शिरोळ – १५, नगरपरिषद क्षेत्र ४०, इतर जिल्हा व राज्यातील ०७ अशा २३४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – २, ०१, ७०८ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९३, ५३९

मृतांची संख्या – ५, ६४४

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २, ५२५