जिल्ह्यात मागील चोवीस तासात १०३० जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
326

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात १०३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १२ जणांचे मृत्यू झाले असून १३०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १८, १५२ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात १६३ तर करवीर तालुक्यात २१६ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १६३, आजरा – २३, भुदरगड – ११, चंदगड- ५, गडहिंग्लज- ५०, गगनबावडा – ०, हातकणंगले – १७२, कागल – ५९,  करवीर- २१६, पन्हाळा – ४६, राधानगरी – १२, शाहूवाडी – २२, शिरोळ – ९९, नगरपरिषद क्षेत्र – १२५, इतर जिल्हा व राज्यातील – २७ अशा १०३० जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , , ०१३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ७२, ८८८

मृतांची संख्या , २९७

उपचार सुरू असलेले रुग्ण १२, ८२८