वालावलकर हायस्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात

0
57

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये पद्मभूषण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

मराठीचे अध्यापक बाळासाहेब कागले, प्रशांत दळवी, नंदा बनगे, संजय सौंदलगे, पल्लवी गंगधर, लक्ष्मी राठोड, उपमुख्याध्यापक बी.ए.लाड यांनी मनोगत व्यक्त केले. सदाशिव राठवळ यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी गंगाधर यांनी मराठी भाषेची महती सांगणारी चित्रफीत प्रदर्शित केली. यावेळी शिक्षक प्रतिनिधी संतोष पोवार, लता चव्हाण, वृषाली कुलकर्णी, मृदुला शिंदे, निर्मला शेळके आदी उपस्थित होते. बी.ए. कागले यांनी आभार मानले.